दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती नाव्हा नगरीत जल्लोष संपन्न झाली..

प्रतिनिधी श्री.अवधूत खाडे

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती नाव्हा नगरीत जल्लोसात संपन्न..
श्री अवधूत खाडे
प्रतिनिधी

आदिवासी जननायक,क्रांतिसुर्य बिरसा मुंडा
जन्म – 15नोव्हेंबर,1875
यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस
विनम्र अभिवादन….

भारतीय स्‍वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्‍हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला.
याच बालकाने पुढे गरीब गरजू व पिडीत आदिवासींसाठी लढवय्या न्‍याय हक्‍कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्‍याला तोड नाही.
त्‍यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक, धरती आबा हा कीताब जनतेनेच बहाल केला.
त्‍यांचे वडील शेतमजूर होते. घरच्‍या गरीबीमुळे त्‍यांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्‍कूलमध्‍ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्‍यांच्‍यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्‍यांना भारतीय संस्‍कृतीचा मनस्‍वी अभिमान होता व तो त्‍यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता, प्रकृतीपूजन व निसर्गवादाचा त्‍यांनी पुरस्‍कार केला.
ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्‍या राजवटीमध्‍ये आदिवासींच्‍या वनसंपत्तीवर असलेल्‍या अधिकारावर बाधा येण्‍यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळे, कंदमूळे, अथवा जनावरांसाठी चारा अथवा लाकुड्फाटे तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि त्यानंतर आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्‍याकरीता आदिवासींनी न्‍यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्‍थापित करण्‍याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्‍यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष व असंतोष निर्माण झाला.
सन १८९४ मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी त्‍यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली. वनऔषधी, झाडपाला, यांद्वारे समाजबांधवांची सेवासुश्रूषा केल्यामुळे समाजबांधव त्यांना भगवान बिरसा म्हणूनही ओळखू लागले.
ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. त्‍यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्‍यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्‍या माध्‍यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. १८९५ मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्‍यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्‍यानंतर आदिवासींच्‍या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्‍वातंत्र्याची आवश्यकता त्‍यांनी ओळखली. त्‍यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्‍यासाठी प्रयत्‍न करुन त्‍यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र स्‍वातंत्र्यलढा पुकारला. ज्याला उलगुलान संबोधले गेले/जाते.
प्रचंडरित्या हयास आणलेल्या इंग्रजांसमोर तीर-कमान यांची शक्ती कमी पडू लागली, संपूर्ण रांची गाव ताब्यात घेवून ३ फेब्रुवारी,१९०० रोजी बिरसा यांना विविध ४८२ गंभीर गुन्हे व प्रकरणांमध्ये आरोपी ठरविण्यात आले.
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा मृत्यू ९ जून, १९०० रोजी रांची येथे केंद्रीय तुरुंगात झाला, ते निसर्गात विलीन झाले, मृत्यु लक्षण कॉलरा नसतानाही तसे घोषित केले.
त्यानंतर रांची येथे डीस्टीलरी पुलाजवळ दफन करण्यात आले.
असा या क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जीवन परिचय सर्व जनतेच्या समोर कार्यकर्त्यांनी मांडला..
या कार्यक्रमाला गावचे ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच व सदस्य बॉडी आणि गावातील प्रतिष्ठित वयोवृद्ध व्यक्तींनी व आदिवासी बांधवांनी हा कार्यक्रम जल्लोष साजरा केला..
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे