जिजामाता विद्यालय पालक-शिक्षक संघच्या अध्यक्षपदी प्रियंका काळे
भेंडा (वार्ताहर)- श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक – पालक संघाच्या अध्यक्षपदी प्रियंका माधव काळे यांची निवड झाली आहे.
प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहविचारसभेत अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली.इयत्ता ५ वी ते १२ वी प्रत्येक वर्गासाठी एक प्रतिनिधी म्हणून प्रियंका आरगडे, सचिन तागड, बाबासाहेब आरगडे, सचिन मडके, अनिल संत, लक्ष्मण आरगडे, विजय थोरे,ज्ञानेश्वर गजरे, अनिल खाटीक, संदीप भालकर, सुखदेव चौधरी, तान्हाजी वाल्हेकर, राहुल मकासरे, संजय बोधक यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे यांनी पालकांच्या आशा-अपेक्षाची पूर्तता करण्यासाठी कटीबद्ध राहू असे आश्वासन दिले.
अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी समस्या व अडचणी मांडल्या. त्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन नूतन अध्यक्षा प्रियांका काळे यांनी दिले.
प्राचार्या डॉ. जयश्री सरवदे,उपप्राचार्य शिरीष विधाटे, पर्यवेक्षक शिवाजी मुंगसे, अॅड. माधव काळे, अॅड. सुनील शिंदे, सचिन तागड, जालिंदर आरगडे, बापूसाहेब कोलते, गोरक्षनाथ पाठक, सुधाकर नवथर, संतोष सोनवणे, आदिनाथ वावरे, अनिल जाधव, अभय कोलते, तुकाराम फटांगरे, सूर्यकांत मोरे, गणेश आरगडे, दीपक वायकर, स्वरूपा देशमुख आदी उपस्थित होते. सुधाकर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अभय कोलते यांनी आभार मानले.