हिंदू समाजाच्या मुलांवरील गुन्हे मागे घ्या…मराठा क्रांती मोर्चा चा ईशारा
नेवासा प्रतिनिधी।आम्हाला वेळीच कळाले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी मुलींच्या छेडछाडीचा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल. अटक करण्यात आलेल्या हिंदू समाजाच्या मुलांवरील दाखल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक कमलेश नवले पाटील यांनी केली.
उंबरे गावातील दोन गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाची बैठक पार पडली. यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांना मुलींच्या सुरक्षेची भीती वाटू लागली आहे. अब्रू जाईल या भीतीने कोणी पुढे येत नाही, याचा गैरफायदा घेतला जात असेल तर, असेल त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा नवले यांनी दिला. केले.
उंबरे गावात लव्ह जिहाद विरोधी मोर्चा काढण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांना पञ पाठवून परवानगी मागितली आहे.
-कमलेश नवले पाटील
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अहमदनगर.
जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र.
कोणी घर सोडू नका. गाव सोडू नका… अटक करायला आले तर मला कळवा, असे सांगून नवले यांनी परिसरातील तरुणांना आवाहन केले.
अटक व्यक्तींना त्वरीत जामीन द्या. लवकर जामीन न मिळाल्यास आमची अटक होण्याची तयारी असेल. आता तुमच्याकडील यादीमधील लोकांना हात लावू नका, असे नवले यांनी पोलिसांना सांगितले. मुलींची छेडछाड करणाऱ्या त्या गटाच्या लोकांना अटक न केल्यास राहुरी येथे मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर, जीवन ज्योत फाऊंडेशन जिल्हाच्या वतीने लव्हजिहाद विरोधी मोर्चा काढण्यात येईल. हिंदुत्वासाठी मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर, जीवन ज्योत फाऊंडेशन आपल्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.