राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
बाळासाहेब पिसाळ
राष्ट्रीय सेवा योजने शिबिरा मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते श्री किशोर सानप नायब तहसीलदार नेवासा
श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मौजे हंडीनिमगाव त्रिवेणीश्वर या ठिकाणी आयोजित केले आहे याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून माननीय किशोर सानप नायब तहसीलदार हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री भिवाजी आघाव होते याप्रसंगी महंत रमेशानंदगिरी महाराजांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संधी मिळते तसेच सात दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना श्रमदानाबरोबरच वेगवेगळ्या विषयावर बौद्धिक व्याख्यानाचे देखील आयोजन केले जाते ही कौतुकास्पद बाब आहे
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री किशोर सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाजासाठी आपण आपला थोडा वेळ महाविद्यालयीन जीवनापासून पासून जर दिला तर उद्याचे आदर्श नागरिक म्हणून समाजामध्ये नावलौकिक मिळवाल राष्ट्रीय सेवा योजना नेहमी समाजभिमुख, पर्यावरण पूरक, महिला सबलीकरण, आर्थिक साक्षरता ,वनराई बंधारे ,वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, मतदार नाव नोंदणी, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याबद्दल सानप साहेब यांनी विशेष कौतुक केले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .गोरक्षनाथ कलापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.नवनाथ आगळे यांनी सात दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कार्तिकी नांगरे यांनी केले तर आभार प्रा. गणेश गारुळे यांनी मानले कार्यक्रम कार्यक्रमाप्रसंगी माननीय बाळासाहेब साळुंखे श्री बाळासाहेब पिसाळ सर डॉ.भीमराव सोनवणे,डॉ.सुरेश काळे ,डॉ.चांगदेव कदम, डॉ. रवींद्र खंदारे ,प्रा.प्रकाश वाळुंज, डॉ.अजय पाटील ,प्रा.योगेश साळवे ,डॉ. हरिभाऊ कर्डिले ,डॉ.संजय शिंदे, डॉ. संजय घनवट ,डॉ.शौकत फकीर, डॉ भागवत बर्डे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता प्रा.अमोल जाधव यांच्या पसायदानाने झाली