दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरचित्रपटपुणेब्रेकिंगमनोरंजन

3 वर्षाच्या मुलीचा डान्स पाहून चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांनी केले कौतुक…

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर शहाजी मांडलिक अहमदनगर

शिरूर प्रतिनिधी :- आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री मेघराज राजेभोसले यांनी नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट शिरूर येथे सदिच्छा भेट दिली.त्यावेळेस संजय ठुबे, भरत घावटे असे अनेक कलावंत ,तंत्रज्ञ व इतर मान्यवर तसेच इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट चे व अश्वयुग फिल्म प्रोडक्शन चे सर्वेसर्वा दिग्दर्शक ,लेखक भाऊसाहेब इरोळे यांनी व अभिनेत्री , कोरिओग्राफर अश्विनी इरोळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

उपस्थित विद्यार्थ्यांमधून शिवज्ञा महाजन या तीन वर्षाच्या मुलीने डान्स केला त्यावेळेस सर्वांनी तिचे कौतुक करून महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी तिचा सन्मान केला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मेघराज राजे भोसले यांनी मार्गदर्शन करून अश्वयुग फिल्म प्रोडक्शन च्या सध्या सुरू असलेल्या चित्रपटाला आणि चित्रपटात इन्स्टिट्यूटचे भूमिका करत असलेले साई चौधरी आणि देवयानी वाळके या कलावंतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे