पुणे प्रतिनिधी – गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेल्या आणि असंख्य कार्यक्रमाला सेलिब्रिटी म्हणून उपस्थिती दर्शवलेल्या अभिनेत्री, कोरिओग्राफर अश्विनी इरोळे यांनी महाराष्ट्रातील गावा-गावातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कलेचे मार्गदर्शन करण्यासाठी त्या शाळा ,महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील बऱ्याच भागात त्यांचा फॅन वर्ग भरपूर असल्यामुळे बऱ्याच भागातून त्यांच्या फॅन ने त्यांना गावातील ग्रामदैवताच्या महाआरतीसाठी, ग्रामपंचायतींना भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयोजकांच्या प्रत्येकाच्या वेळेनुसार भेट देणे सध्या त्यांना शक्य नसल्यामुळे कारण अश्विनी इरोळे यांचे सध्या पाच चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांना तिकडे जास्त वेळ द्यावा लागत आहे आणि या चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना इतर कार्याला वेळ देता येणार नसल्याने परंतु एक विचाराने त्यांचे फॅन सुद्धा नाराज होऊ नये म्हणून त्यांनी ज्या ज्या भागातून त्यांना बोलवले गेले आहे त्या त्या भागात सलग आठ ते पंधरा दिवसांचा महाराष्ट्र दर्शन या पद्धतीने दौरा सुरू करून उपस्थित राहायचे ठरवले आहे.
अश्विनी इरोळे या एक उत्तम अभिनेत्री आणि कोरिओग्राफर असून नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट, अश्वयुग फिल्म प्रोडक्शन, अश्वयुग ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, अश्वयुग महिला मंच आणि अश्वयुग इव्हेंट मॅनेजमेंटच्या त्या संचालिका सुद्धा आहेत. अश्विनी इरोळे यांच्या या महाराष्ट्र दर्शनासाठी सध्या त्यांना महाराष्ट्रभरातून भरपूर संपर्क होत असून त्यांचे हे महाराष्ट्र दर्शन डिसेंबर मध्ये सुरू होईल. आणि त्या कधी कोणत्या भागात कार्यक्रमासाठी उपस्थित असतील या सर्व माहितीसाठी आपण लेखन ,दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांच्याशी 9604869733 या नंबरवर संपर्क करू शकता. अभिनेत्री ,कोरिओग्राफर अश्विनी इरोळे यांना पुढील कार्यासाठी दैनिक देशरत्न न्युज तसेच जनप्रतिसाद न्युज अहमदनगर जिल्हाचे पत्रकार मयुर मांडलिक यांच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा.