सोनई प्रतिनिधी।नेवासा तालुक्यातील माजी.आमदार व नगर जिल्ह्याचे माजी.खासदार.तुकाराम गंगाधर गडाख पा.यांना शुक्रवार (दि. 2 डिसेंबर) रोजी रात्री 11.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांना दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी 12.00 वाजता पानसवाडी येथे होणार आहे.
माजी. खासदार. तुकाराम गंगाधर गडाख पा. यांच्या अकाली निधनाने नेवासा तालुक्यावरच नव्हे तर नगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गडाख हे तालुक्यातील ज्येष्ठ नेते स्व. मा आ मारुतराव घुले पाटील यांचा पराभव करून तत्कालीन नेवासा – शेवगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार बनले होते. त्यानंतर ते तत्कालीन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.