तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..
बाळासाहेब पिसाळ

*”माजी विद्यार्थी स्नेहमेळावा”*
*तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांच्या किलबीलाटाने गजबजली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी सय्यदमीर..*
*आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा*
*सन 2010 साली इयत्ता दहावी मध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल 15 वर्षांनी आज शाळेत एकत्र आले होते. पंधरा वर्षांपूर्वीच्या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गजबजली.असल्याचे चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पहावयास मिळाले. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो लहानसे मोठे झालो व गुरुजनांच्या शिकवणुकीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो असे असतानाच पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. गुरुजनांना भेटावे; सोबत शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणी यांच्याशी गप्पा माराव्यात या संकल्पनेतून 2010 वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण शालेय माजी विद्यार्थी यांनी स्नेह मेळाव्याच्या आयोजन केले होते. माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात पार पाडला एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा शिक्षक; वर्ग;मित्र हे त्यांच्या जीवनात कशा पद्धतीने कलाटणी मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. इयत्ता दहावीला अध्यापन करणारे माजी शिक्षक अध्यापक संजय कुमार सरवदे सध्या कार्यरत अहिल्यानगर उपशिक्षण विभाग अरुण भापकर ; भाऊसाहेब चव्हाण (सध्या कार्यरत सुलेमान देवळा) बाळासाहेब सायकड (क्रीडा शिक्षक) लोणी जिल्हा परिषद शाळा सुनील बोंडगे (डोंगरगण प्राथमिक शाळा मुख्याध्यापक) सुरेश नरोड (कन्या विद्यालय आष्टी) तसेच अंभोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सातव पोलीस हेडकॉन्स्टेबल मिसाळ उपस्थित होते. सर्वांनी आपले विचार मेळाव्याच्या माध्यमातून प्रकट करून मार्गदर्शन केले.या सर्व शिक्षकांचे औक्षण करत त्यांचे शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून स्वागत व सन्मानचे नवीन सादर करण्यात आला पंधरा वर्षापूर्वी माजी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत होते त्या काळात शाळेत आजूबाजूला असलेल्या लहान लहान दुकानांमध्ये मिळत असलेला बोरकुट ;चिंच ;चॉकलेट हे आठवणींना देखील उजाळा देण्यात आला. शाळेची घंटा राष्ट्रगीत या आठवणींनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर “सध्या मी कोणी”या सदरामधून प्रत्येकाने आपली ओळख करून दिली शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी का उपयोगी असे भेटवस्तू दिला तसेच सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी केले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी 2010 च्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी सहकार्य व मदत केली. शालेय पोषण आहार समितीचे मदतनीस आसिफ सय्यद जावेद मंडप डेकोरेटर चे सादिक भाई बेग व जावेद भाई बेग यांनी मौलिक सहकार्य केले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हसणे मेळावा पार पडला.*