कंधार प्रतिनिधी | दिनांक:-15/02/2022 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस .आर .लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय, नांदेड जिल्हा मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम (प्रेरणा प्रकल्प अंतर्गत) ‘ताणतणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर’ व संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिबिराला भरपूर साथ मिळाला असून संशयित मनोरुग्णाची लक्षणे सांगितली असता, स्मरणशक्ती कमकुवत होणे, अकारण चिडणे किंवा भडकणे, झोप न येणे, सतत गप्प बसून राहणे, अकारण अति बडबड, भुकेचे विस्मरण, अकारण अस्वस्थ होणे, अकारण हसणे किंवा रडणे, काल्पनिक आवाज ऐकू येणे, अति संशयावस्था किंवा संभ्रमावस्था. असे असूनही रुग्ण आजार नाकरत असल्यास तो संशयित मनोरुग्ण समजावा अशी माहिती दिली.
उपस्थित मानसोपचार तज्ञ डॉ. शाहू शिराढोणकर, श्रीमती. सुधा टेकुळे (समुपदेशन परिचारिका) श्रीमती जयश्री गोरडवार (सामाजिक कार्यकर्ता ) कंधार ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीनारायण पवार (NCD वैद्यकीय अधिकारी) डॉ. महेश पोकले (दंत शल्यचिकित्सक), डॉ.दत्तात्रय गुडमेवार(आयुष्य वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्राजक्ता बंडेवार (आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर),डॉ. निखत फातिमा (यूनानी मेडिकल ऑफिसर), श्रीमती.पार्वतीवाघमारे(अधिपरिचारिका), श्रीमती. आऊबाई भुरके (NCDअधिपरिचारिका), श्री. अरविंद वाटोरे (NCDसमुपदेशक),श्री. दिलीप कांबळे औषध निर्माण अधिकारी, श्री प्रशांत कुमठेकर (स्टाफ ब्रदर), निमिषा कांबळे, चंचल गवाले, श्री.अशोक दुरपडे, याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.