
हदगाव दि. २८ (प्रतिनिधी) दिनांक १६ जानेवारी ते २८जानेवारी२०२३ या कालावधीमध्ये श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगाव येथे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” आयोजित करण्यात आला . महाविद्यालय स्तरावर मराठी भाषा विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये वाद विवाद स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धा , काव्यवाचन स्पर्धा. निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आणि अभिव्यक्तीला प्रेरित करून प्रोत्साहन देण्यात आले. मराठी भाषा आणि भाषेचे ऐतिहासिक व व्यवहारिक महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा डॉ मुक्ता बिरादार मॅडम, प्रा डॉ ज्ञानेश्वर कदम, प्रा राजेश राऊत यांनी या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेचे विविध अंगाने व स्पर्धात्मक उपक्रमातून भाषा संवर्धनाबाबत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. त्यानंतर दिनांक २८/०१/२०२३ रोजी महाविद्यालयामध्ये समारोप सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ ढोले . प्रमुख पाहुणे , प्रा टकले प्रा डॉ. नरवाडे हे होते . त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे परीक्षक म्हणून सतत उपस्थित असलेले प्रा.सोनोने, प्रा शेळके, प्रा. कोंडलवाडे हे समारोप प्रसंगी उपस्थित होते.