प्रतिनिधी:-
मुखेङ
पवित्र श्रावण मास निमित्त १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय धर्माचार्य . समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण विनोदाचार्य ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सावरगाव पी. येथे किर्तन होणार आहे.
भाजपाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रामराव मस्कले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सोहळ्याचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते होणार तर अध्यक्षस्थानी नांदेङ जिल्हयाचे खाजदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे हे राहणार आहेत तसेच अन्य मान्यवरही या ठिकानी उपस्थित राहणार आहेत.
श्रावण महिना हा हिंदू धर्माचा पवित्र अशा महिना असून या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयो जन करण्यात येते.
या माध्यमातून भाजपचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रामराव मस्कले यांनी तालुक्यातील व या भागातील सर्व जनतेस व भाविकांसाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळा आयोजित केला आहे.
या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्ते रामराव पा.मस्कले यांनी,जणतेला आवाहन केले आहे..
सावरगाव पी, सावरगाव वाडी, कामजळगा, मंग्याळ, सांगवी बेनक, लादगा, शिकारा, शिरुर दबडे येथील या गावातील नागरिक व मित्रमंडळाने केल आहे.!