नांदेड /दि.१०दररोजचे बैठका, दौरे आणि इतर कामाच्या व्यापात असलेल्या मा. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायची म्हणजे नागरिकांना महत्प्रयास करावे लागतात. मात्र त्यावर मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीच तोडगा काढला असून, आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवले आहेत.
सर्व सामान्य नागरिकांचे प्रशासनस्तरावरील अनेक प्रश्न प्रलंबित असतात त्याबाबत नागरीक मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने देतात त्या निवेदनावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई देखील केली जाते मात्र प्रत्यक्ष मा. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला प्रश्न त्यांच्या कानावर टाकला, तर हा प्रश्न लवकर सुटेल, तसेच कांही अडचणी सांगितल्यानंतरच लक्षात येऊ शकतात. त्यामुळे अनेकजण थेट मा.जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येतात. मात्र, जिल्हा आणि विभागस्तरावरील बैठका, दौरे आणि इतर कारणांमुळे अनेक वेळा मा जिल्हाधिकारी भेटू शकत नाहीत. अशा वेळी दूर अंतरावरून आलेल्या नागरिकांचे हेलपाटे होतात. पुन्हा दुसऱ्यावेळी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन मा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रत्येक आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार” हेड क्वार्टर डे “जाहीर केला असून, यादिवासी शक्यतो दौऱ्यावर न जाता नागरिकांना भेटीसाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना थेट भेटून आपले गाऱ्हाणे मांडयचे असेल तर शक्यतो सोमवारी आणि गुरुवारी या दिवशीच नागरिकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार आहे.
दररोजचे बैठका, दौरे आणि इतर कामाच्या व्यापात असलेल्या मा. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायची म्हणजे नागरिकांना महत्प्रयास करावे लागतात. मात्र त्यावर मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीच तोडगा काढला असून, आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवले आहेत.