दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

*नेवासा नगरपंचायत हद्दीतील राहत्या जागा नावावर करा* *नेवासा काँग्रेसचे धरणे आंदोलनाचे नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*

प्रतिनिधी:- लखन वाल्हेकर

(नेवासा प्रतिनिधी):- नेवासा नगरपंचायत हद्दीतील राहत्या जागा नावावर करण्यासंदर्भात धरणे आंदोलनाचे निवेदन नेवासा काँग्रेसने नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले.

 

नेवासा नगरपंचायत हद्दीतील मारुतीनगर, लक्ष्मीनगर, गंगानगर, खळवाडी, मध्यमेश्वर याठिकाणी वास्तव्यास असलेली अनेक कुटुंब अशी आहेत की , ज्यांच्या नावावर अजूनही राहत्या जागाची नोंद नाही . त्यामुळे या कुटुंबांना घरकुल, कूपन, बँक कर्ज, तसेच इतरही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. वर्षानुवर्ष ही कुटूंब सरकारी योजनापासून वंचित राहिली आहे.

या कुटुंबाकडून नियमित घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जाते . यासंदर्भात नेवासा काँग्रेसने वेळोवेळी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदने देखिल दीली होती . तसेच एजंसी मार्फत सर्वेक्षण करुण तातडीनं या कुटुंबाचा प्रश्न कायमस्वरपी सोडविण्यात येइल असेही आश्वासन देण्यात आले होते.

 

परंतु या विषया संदर्भात अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज नेवासा काँग्रेस कमिटी कडून धरने आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करून , वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेवून वंचितांना न्याय मिळवून देवू असे स्पष्ट केले.

शहर अल्पसंख्यांक विभागांचे अध्यक्ष अंजुम पटेल यांनी शहरातील जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवून ते सोडविण्यासाठी प्राधान्य देवू असे स्पष्ट केले.

शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी शहरांतील प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आग्रही भूमिका घेईल असे स्पष्ट केले.

यावेळी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष रमेश जाधव, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष मुन्ना आतार, शहर उपाध्यक्ष मुसा बागवान, शहर काँग्रेसचे इम्रान पटेल, संदीप मोटे, शाम मोरे, संतोष बर्डे, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, मीडिया प्रमुख सचिन बोर्डे, महीला काँग्रेसच्या शोभा पातारे, संजय होडगर, भगीरथ दाणे, सतिष तऱ्हाळ, राजूभाई पिंजारी, पिंटू पवार, दीपक धोत्रे आदीसह शहरातील नागरिक उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे