दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरई-पेपरब्रेकिंग

अश्वयुग महिला मंच ची अंध-अपंग महाविद्यालयाला भेट

दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर शहाजी मांडलिक

अहमदनगर प्रतिनिधी – दोन महिन्यापूर्वी सुरू झालेले अश्वयुग महिला मंच ने आजपर्यंत महिलांसाठी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सहल , सामाजिक संस्थेला भेट इत्यादी असे  वेगवेगळे उपक्रम राबवले आहे.

या महिला मंचने महिलांसाठी नुकतेच मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या न्यू व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयातील निवासी अंध अपंग  विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळेस येथील विद्यार्थ्यांनी अश्वयुग महिला  मंचच्या सर्व महिलांचे स्वागत गीत  सादर करून स्वागत केले. तसेच संस्थेच्या वतीने सर्व महिलांचा शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा जाई खामकर स्वतः शंभर टक्के  अंध असून त्या जीवनातील खडतर  प्रवास सांगत असताना उपस्थित महिलांचे डोळे पाणावले.

अश्वयुग महिला मंचच्या सभासद अभिनेत्री कोरिओग्राफी, अश्विनी इरोळे , सुरेखा पोटघन। सोनिया चौधरी, रोहिणी वाळके, अंजूम शेख, गौरी कदम गौरी इत्यादी सभासद महिलांनी तेथील विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी आर्थिक मदत केली. त्यावेळेस संस्थेच्या संस्थापिका, अध्यक्षा जाई खामकर यांच्या सह. विद्यार्थ्यांबरोबर मंचच्या महिलेंनी गप्पागोष्टी केल्या. आणि अभिनेत्री अश्विनी इरोळे यांनी विद्यार्थ्यांना कलेबद्दल मार्गदर्शन केले तसेच रोहिणी वाळके यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे