लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार पूर्ण मतदारसंघातलेच नाहीतर गोरगरिबांचे पूर्ण जिल्ह्याचे काम करीत त्यांच्याकडे जे जे येतील त्यांचे काम करतात. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बामणी (प.क) येथील आमदार स्थानिक विकास निधीतून ०५ लक्ष रुपयांचा सीसी रस्ता, नाली व ०७ लक्ष रुपयांचा २५१५ हेड अंतर्गत रोड विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पार पाडला.
आमदारांनी बामणी साठी 12 लक्ष निधी, पांगरासाठी ९ लक्ष निधी, घोडजसाठी 30 लक्ष निधी, बाळंतवाडीसाठी ९ लक्ष निधी, आनंदवाडीसाठी ५ लक्ष निधी, जांभुळवाडीसाठी ५ लक्ष निधी, मजरे धर्मापुरीसाठी १५ लक्ष निधी, बोरीसाठी ११.५० निधी, मानसपुरीसाठी १३ लक्ष निधी, नवघरवाडीसाठी १० लक्ष निधी, वंजारवाडीसाठी १० लक्ष निधी, कोटबाजारसाठी ६ लक्ष निधी, बहादरपुरासाठी ९ लक्ष निधी, लाठखुर्दसाठी ७ लक्ष निधी, नवरंगपुरासाठी ५ लक्ष निधी, पानभोसीसाठी ८ लक्ष निधी, गंगनबीडसाठी ५ लक्ष निधी हे सर्व आमदार निधीतून ९२ लक्ष आणि २५१५ मधून ७८ लक्ष असा १ कोटी ७० लाख निधी कंधार सर्कलला या अडीच वर्षात दिलेला आहे. असा सर्वात जास्त निधी खेचून आणणारे आमदार शामसुंदर साहेब आहे अशी माहिती दिली.
यावेळी सौ. लक्ष्मीबाई मारोतराव कदम (माजी सरपंच), शिवराज पाटील शिंदे (हळदेकर), रतन पाटील सर्जे सर, शंकर पाटील कदम, मनोज पाटील शिरसे (लाठी सरपंच),सदाशिव पाटील कदम, अमोल वडजे पाटील ,विनायक शिंगारपुतळे ,जयंत वाघमारे, गिरीश डिगोळे, जमीर पठाण, सदस्य व गावातील नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.