दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

प्रधानमंत्री आवास योजनेतील थकीत रक्कम लाभार्थ्यांना द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी

कंधार ता. प्रतिनिधी: एम. जे. सय्यद

कंधार ता. प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजनेद्वारे शहरी व ग्रामीण भागातील बेघरांना घरे दिले जाते. कंधार शहरातील बेघरांना घरे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कंधार नगर पालिके कडून अडवणूक होत आहे. या लाभार्थ्यांची १४ हजार रुपये थकीत आहे. थकित रकमेसाठी वारंवार चकरा मारूनही अद्यापही रकम मिळाली नाही. थकीत रक्कम लाभार्थ्यांना तात्काळ मंजूर करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका सरचिटणीस अहेमद मेहबूब पठाण यांनी निवेदनाद्वारे नगर पालिका प्रशासनाला दिला.

कंधार तालुक्यातील नागरीकांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून सर्व बेघरांना घरे उपलब्ध करून देत आहे. प्रधानमंत्री आवास योजना नगरपरिषद कंधार मार्फत राबवत आहे. आवास योजनेसाठी २ लाख ५० हजार रु अनुदान असून, कंधार शहरातील लाभाथ्र्यांच्या खात्यात नगरपालिकेकडून १४ हजार रुपये येणे बाकी आहे. थकीत रक्कम न मिळाल्यास लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले आहे. रक्कम न मिळाल्याने मानसिक त्रास होत आहे. थकीत १४ हजार रु. लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

थकित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास वंचीत बहुजण आघाडी कडुन अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी राम बोरगावकर यांना दिला. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका सरचिटणीस अहेमद महेबुब पठाण, शहराध्यक्ष सय्यद मोहसीन बागवान, हाजीशाह मौलाशाह, विजय हनमंतराव सोनकांबळे, पठाण शब्बीर दादामीयाँ, देवीदास राजाराम गरुडकर, किशन अनाजी लुंगारे, कुरेशी खदीर बाबामीयाँ, महानंदा नंदकिशोर लुंगारे, सुलतान मौलाशाह पठाण, सय्यद, सय्यद मेहराज जिलानी, सोहेल इसूफ पठान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे