मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
शनी शिंगणापूर प्रतिनिधी – आला बाबूराव.. आता आला बाबूराव …या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले या गाण्यातील कलाकार सुरेश कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत शनिशिंगणापूर येथे येऊन आज शनिदर्शन घेतले.देवस्थानच्या वतीने सचिन बेल्हेकर यांनी कांबळे यांना सन्मानित केले.यावेळी त्यांच्या समवेत अहमदनगर आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक संजय वैरागर उपस्थित होते. यावेळी घोडेगाव परिसरातील नागरिकांनी सुरेश कांबळे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.या कार्यक्रमात कांबळे यांच्यासोबत प्रकाश काळोखे ,प्रीती भालेकर (अहमदनगर) रंगनाथ पिसाळ, एकनाथ घोलवाड (औरंगाबाद), संतोष निकाळजे( बुलढाणा) ,रवींद्र चव्हाण (नेवासा) ,भाऊसाहेब गायकवाड, (बेल्हेकरवाडी), आदी मान्यवर उपस्थित होतेयावेळी रवी आंग्रे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते .प्रारंभी आरपीआयचे शहराध्यक्ष जगन्नाथ लोंढे यांनी कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी कांबळे यांनी घोडेगाव हे कलेचे माहेरघर असले बाबत समाधान व्यक्त केलं यावेळी सुधीर वैरागर आणि सुनील वैरागर यांनी कै. नाथा मास्तर घोडेगावकर लिखित “डोम्या नाग ” ही कादंबरी सुरेश कांबळे यांना भेट दिली.या वेळी परिसरातून अनेक नागरिकांनी गर्दी केली होती अनेकांनी त्यांच्या समवेत सेल्फी फोटो चा आनंद घेतला त्यावेळी अनेकांनी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या तर संजय वैरागर यांनी आभार मांनले.