नेवासा प्रतिनिधी-
*बियाणांसाठी शेतकऱ्यांची होते त्रेधातिरपीट*
गेल्या वर्षी पासून शेतकरी अवर्षण,दुष्काळ, पाणीटंचाई, गारपीट अशा असंख्य समस्या ने ग्रस्त असून देखील पुन्हा एक नव्या आशेने पीक चांगले येईल पाऊस होईल या आशेने जोमाने लढायला सज्ज झाला आहे.
परंतु अजून पाऊस झालेला नसताना देखील शेतकरी कृषिसेवा केंद्रात बी खरेदीसाठी रोज चक्कर मारत असून जे हवं ते बियाणे शिल्लक नाही, किंवा असेल तर त्या सोबत दुसर बियाणे घ्यावं लागेल असे एक ना अनेक कारणे कृषिसेवा केंद्रा वाले शेतकऱ्यांना देत असतात.
शेतकऱ्यांना कापूस म्हणजे पांढरे सोन अस आपण म्हणतो पण त्यांना जे वाण हवे आहे ते एकतर शिल्लक नाही म्हणून सांगितले जाते किंवा त्याला जोडीला दुसर वाण इच्छा नसताना घ्यायची वेळ येत आहे.
याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक शेतकऱ्यांना येताना तालुक्यात दिसून येत आहे. जर तुमच्या कृषिसेवा केंद्रात संबंधित वाण नसेल तर सरळ तसे बाहेर फलकावर आपण लिहले पाहिजे आणि सर्वांना समान न्याय म्हणून ते वाण कुणालाच दिले गेले नाही पाहिजे परंतु श्रीमंत शेतकऱ्यांना ते वाण उपलब्ध होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील ते मिळालें पाहिजे, शेतकऱ्यांची मनातून इच्छा नसताना केवळ हवं ते वाण भेटावं म्हणून दुसऱ्या कंपनी चे वाण त्यांना बळजबरीने चिपकवले जात आहे,
याची शहानिशा केली जावी
व संबंधित बियाणे तुटवडा मध्ये तालुक्यातील कृषिअधिकारी जिल्हा कृषिअधिकारी व कृषिमंत्री यांनी यात लक्ष घालून सर्वसामान्य शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती