दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेड

धनमुद्रा अर्बनतर्फे लोहा शाखा येथे नववर्ष कॅलेंडर वाटप व योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न…

प्रतिनिधि : एम. जे. सय्यद

लोहा: धनमुद्रा अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नांदेड यांच्या वतीने लोहा शाखा येथे नववर्षाच्या निमित्ताने कॅलेंडर वाटप तसेच विविध आर्थिक योजनांची माहिती देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात ग्राहक, खातेधारक व नागरिकांना नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुदत ठेव, मासिक ठेव, गृहकर्ज, तसेच इतर लाभदायक आर्थिक योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीपर्यंतच्या ठेवींवर आकर्षक व्याजदर, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी धनमुद्रा अर्बनच्या पारदर्शक व विश्वासार्ह सेवांबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहा शाखेतील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे संस्था व ग्राहक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे