कंधार ता. प्रतिनिधी : कंधार येथील छोटी दर्गा येथे तीन महिन्यांपासून आई-वडिलांसह वास्तव्यास राहत असताना हजर मिरासाब कुरेशी या ३२ वर्षीय व्यक्तीचा शहरातील जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. ३० रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
कंधार येथील छोटी दर्गा येथे तीन महिन्यांपासून मयत मजहर मिरासाब कुरेशी (रा.म्हैसा तेलंगणा) मानसिक संतुलन बिघडल्याने तब्येत सुधारावी या श्रद्धेपेटी मयत मजहरच्या आई- वडिलांसह गेली तीन महिन्यांपासून वास्तव्यात होते. दि.३० रोजी मयतास जास्त तणाव आल्याने वेडाच्या भरात झाला. मयताचे वडील मिरासाब अकबर कुरेशी यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास सहायक उप पोलिस निरीक्षक आर.यू.गणाचार्य हे करीत आहेत.