दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी 24*7 हेल्पलाईन गणेशोत्सवानिमित्त चाकरमण्यांकरिता सुरु 

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने या सेवेची सुरुवात

 

सागर पवार – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड : दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने मुंबई – गोवा महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त येणाऱ्या – जाणाऱ्या चाकरमनी यांच्याकरिता भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी 24*7 हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये प्रवाश्यांकारिता मोफत अत्यावश्यक औषधे ( ब्लडप्रेशर, डायबेटीस व इतर ) यांचा पुरवठा, एखादा अपघात किंवा कोणतीही अडचण आल्यास मदतकार्य, मोटार / वाहन रात्री अपरात्री बिघडल्यास दुरुस्तीकरीता मॅकेनिक, प्रवासादरम्यान ट्रॅफिक उद्भवल्यास लहान बाळांना दूधपुरवठा, पोलीस व प्रवासी यांचा संपर्क करून देण्याकरिता मदत केंद्र ह्या सगळ्या सुविधा प्रवाश्यांना +917709650503/ +918260484848 ह्या एका फोन वर उपलब्ध करून दिल्या आहेत, आजपर्यंत शेकडो लोकांनी सदर हेल्पलाईन चा वापर करून सहकार्य मिळवले आहे. सदर हेल्पलाईन चे उदघाटन दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आ. धैर्यशीलदादा पाटील यांच्या शुभहस्ते वाकण येथे तर माणगाव येथे माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलीस निरीक्षक सतीश अस्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश कुंडलिक थोरे, पेण विधानसभा संयोजक प्रसाददादा भोईर, पाली उपनगराध्यक्ष अरिफजी मणियार, सोपान जांभेकर, सुशिल शर्मा, सोशल मीडिया संयोजक प्रियांका पिंपळे, उ. भा. सेल उपाध्यक्ष दुबेजी, वैशाली शेडगे, मुग्धा गडकरी, लाड, मकरंद गडकरी, परेश सांगले, मंदार मढवी व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे