रायगड

नाभिक समाजाचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने नाभिक समाजाच्या वतीने मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारून काढला मोर्चा

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

भाजपा चे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील जाहीर सभेत आघाडी सरकार वर राजकीय वभाडे काढत असताना आघाडी सरकार हे  तिरुपती बालाजी येथील न्हावी एकाचे केस आर्धे काढतात त्याला बसुन ठेवतात मग दुसऱ्याचे काढतात असा एकेरी भाषोत उल्लेख केल्याने सामाजाच्या भावना दुखवल्या असल्याने महाड तालुका नाभिक सामाज यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दक्षिण रायगड मधील महाड, पोलादपुर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालूक्यातील समाजा बांधवांनी महाडमध्ये एकत्र येऊन छत्रपती च्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून घोषणा देत मुंडन करून दानवे यांच्या फोटोला जोडे मारून महाड शहरातुन मोर्चा काढण्यात आला.

त्या नंतर  प्रांत कार्यालय येथे जाऊन प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी नाभिक तरुण संघ जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे, डॉ. अनंत खराडे, पंचक्रोशी अध्यक्ष बबन सकपाळ, संतोष गायकवाड, तृप्ती सकपाळ, उर्मिला पांडे, यशवंत खराडे, समीर शिर्के, नितीन सकपाळअक्षय सपकाळ ,पप्पू पांडे, पंढरी शिंदे, ओमकार मोहिते, विशाखा यादव, विनायक दिवेकर, आदेश बुरुनकर आदी पदाधिकाऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे