दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

महाड मध्ये गंभीर घटना / मोबाईल बॅटरी फुटून 06 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

 

सागर पवार – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 27 रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील आंबीवली गावात घडली.

अनिता दिनेश वाघमारे ही 06 वर्षीय असून या स्फोटात तिच्या तोंडाला व जबड्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने तिला जखमी अवस्थेत तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचा अतिवापर वाढला असून मोबाईलच्या आहारी जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे