बहिरवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी हारदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन*
बाळासाहेब पिसाळ
*बहिरवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी हारदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन* परिसरात हळहळ शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार नेवासा प्रतिनिधी बहिरवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बहिरवाडी देवस्थानचे विश्वस्त व माजी सरपंच सुनील हारदे यांचे वडील यांची आज मंगळवार 23 मे रोजी सकाळी आठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले याप्रसंगी बहिरवाडी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्वाभिमानी आणि एक वचनी एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता , परिसरातील ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले शिवाजी महाराज हारदेआपल्यातून निघून गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी याप्रसंगी श्रद्धांजली वाहतांना बोलले. याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्ये दुपारी ठीक बारा वाजता शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृत्युपच्यात त्यांना दोन भाऊ, दोन मुले, सून पत्नी असा मोठा गोतावळा हारदे परिवारा मध्ये आहे.