दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विकसित भारत रथाचे हंडीनिमगाव येथे स्वागत

बाळासाहेब पिसाळ

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या दमदार कामगिरी ची माहिती विकसित भारत या रथाच्या मार्फत व्हिडीओ प्रणाली द्वारे आज हंडीनिमगाव या ठिकाणी सादर करण्यात आले. यावेळी या विकसित भारत रथ यात्रेचे उदघाटन हंडीनिमगाव चे सरपंच आघाव यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी आवर्जून ग्रा.प.सदस्य बाळासाहेब पिसाळ, ग्रामसेवक भोंगे मॅडम,तलाठी बांगर मॅडम,समुदाय आरोग्य अधिकारी प्रवीण वालोकर,आरोग्य सेवक रवींद्र गायकवाड ,हंडीनिमगाव जी.प.शाळा चे सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक, सीआरपी मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते
या व्हिडीओ चित्रफीत च्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी. त्यांना त्याचा लाभ मिळावा. यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधून या यात्रेला हिरवा कंदील देऊन सुरुवात केली.विकसित भारताच्या संकल्पात आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका आहे. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ जो काही विकास झाला, त्याची व्याप्ती देशातील काही मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली. मात्र आज आपण देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांच्या विकासावर भर देत आहोत. देशातील शेकडो लहान शहरे विकसित भारताची भव्य इमारत मजबूत करणार आहेत. त्यामुळे अमृत मिशन असो की स्मार्ट सिटी मिशन, या अंतर्गत छोट्या शहरांमधील मूलभूत सुविधा सुधारल्या जात आहेत. पाणीपुरवठा असेल , मल निःसारण आणि सांडपाणी व्यवस्था असेल , वाहतूक व्यवस्था असेल , शहरांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असेल , या सगळ्यांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छता असो, सार्वजनिक शौचालये असोत, एलईडी पथदिवे असोत, शहरांमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. आणि याचा थेट प्रभाव जीवन सुखकर करण्यावर पडला आहे, प्रवास सुलभतेवर झाला आहे, व्यवसाय सुलभतेवर झाला आहे. गरीब असो की नव-मध्यमवर्गीय, जे नुकतेच गरिबीतून बाहेर आले आहेत, एक नवीन मध्यमवर्गीय कुटुंब जन्माला येत आहे. मध्यमवर्गीय असो वा सधन कुटुंब, प्रत्येकाला या वाढत्या सुविधांचा लाभ मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे