दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने कलाकार बांधवांसाठी आर्थिक मदत….

प्रतिनिधी-हर्षद तुकाराम यरवलकर

रायगड प्रतिनिधी। नवीन पनवेल येथील जाणीव सामाजिक संस्था यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला कलाकार बांधवांसाठी आर्थिक मदत करण्यात आली.
रंगभूमी संगीत कला मंच या कलाकारांच्या संस्थेला मदत करण्यात आली.खरंतर कोरोना महामारीमुळे जगभरात नाजूज परिस्थिती निर्माण झाली आहे.रंगभूमी बंद असल्या कारणाने कलाकार हताश आहेत, आज दीड वर्ष झाली आपण कोरोना सोबत झुंजत आहोत.
खरंतर समाजाचा कलाकारा कडे पाहण्याचा दृष्टिकोन गरीब म्हणून नाही मात्र दीड वर्षे रोजगाराशिवाय राहणं सोपं नाही. अशी प्रतिक्रिया राजेश केणी यांनी दिली. खरंतर आमची मदत ही अगदी छोटी आहे मात्र आमच्या परीने समाजासाठी काहीतरी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं समाधान निश्चित असल्याची भावना राजेश केणी यांनी व्यक्त केली.
या वेळेस जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा उपसभापती राजेश केणी, खजिनदार संदीपजी यादव, जाणीव चे सदस्य तथा पनवेल पंचायत समिती सदस्य स्वप्नीलजी भुजंग, अनिलजी उलवेकर आदी मंडळी उपस्थित होते.
कलाकाराच्या वतीने प्रसिद्ध कवी एकनाथ माळी साहेब यांनी जाणीव च्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या खास शैलीत जाणीव च्या कार्यावर एक सुंदर गाण तयार करण्याचा शब्द एकनाथ माळी साहेबांनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे