अंधानेर पुलावर पुराच्या पाण्याने थैमान, वाहतूक करणारे प्रवासी नागरिक त्रस्त…..
प्रतिनिधी किरण दांडगे
कन्नड प्रतिनिधी।अंधानेर ता कन्नड येथील शिवना नदीवर असलेला पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने येणारे जाणारे प्रवासी गावकरी नागरिक त्रस्त, आरोग्य यंत्रणा गावात येऊ शकत नाही किंवा प्रेग्नेंट असलेल्या महिलांना तालुक्यातील ठिकाणी नेता येऊ शकत नाही, सदर प्रश्न अत्यंत गंभीर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कन्नड यांनी पुलावर सुरक्षा कठडे लावून अथवा पुलाची उंची वाढवण्याची दक्षता घ्यावी नेहमी दरवर्षी अश्या समस्याना सामोरं जाने हा पर्याय अंतिम न ठेवता दुरुस्ती करून पुलाची उंची वाढवन्यात यावी.
आजारी असलेल्या प्रवाश्यांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय कन्नड येते जाण्यासाठी समस्या येत आहे पाणी जास्त प्रमाणात पुलावरून वाहत असल्यामुळे कुणीही जाण्यासाठी तयार नाही नाईलाजाने खाजगी दवाखान्यात अधिकचे पैसे मोजावे लागत आहे व सामान्य लोकांना खाजगी दवाखान्यातील खर्च खिशाला न परवडणारा आहे आधीच लोक कोरोना व पावसाळा लागला तेव्हापासून डेंगू चिकुनगुनिया आजाराने त्रस्त आहेत आणि पावसाच्या अधिकच्या पाण्याने पुलावर पाण्याने थैमान घातलंय कन्नड तालुक्यातील मुंडवाडी, साखरवेल पळशी या गावांना पाण्यामुळे फटका बसला आहे.
“चाळीसगाव कडे जाणारा जुना महामार्ग 211, नवीन महा(52) पूर्णपणे वाहतूक टप्प झाली आहे त्यामुळे कन्नड तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे तसेच चाळीसगाव घाट वाहतूक करण्यास अत्यंत धोकादायक झाला असून पर्यायी नागद घाट ही अत्यंत गंभीर स्वरूपात खचला आहे त्यामुळे चाळीसगाव घाटाला पर्यायी पाटणा कळंकी मुंडवाडी अंधानेर मार्गे वळवून नवीन महामार्ग 52ला जोडण्याची योजना परिवहन व शासकीय यंत्रणा आखावी व विस्कळीत असलेल्या गावात पर्यायी नव्याने महामार्ग सुरु करून बाजारपेठ उपलब्ध करावी.”
—श्री.संदिप आळींग (सामाजिक कार्यकर्ते)