रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग डॉक्टरांच्या निष्काळजीपणामूळे नवजात बालकाचा मृत्यू
दोशी डॉक्टरांवर रुग्णाचे पती रुपेश काटले व नातेवाईकांची कठोर कारवाई करण्याची मागणी
सागर पवार | जिल्हा प्रतिनिधी रायगड
अलिबाग : शनिवार दि. 14 मे रोजी, सकाळी 04 वाजता डिलिव्हरीसाठी पेशंट राधिका रुपेश काटले रा. बेलोशी यांना ऍडमिट केली, पेशन्ट चे सर्व रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा डॉक्टर उपचार करण्यासाठी जागेवर हजर नसल्यामुळे बालकाचा प्रसुती नॉर्मल होऊन सुद्धा मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे घडली.
सदर प्रसुती डॉक्टर नसल्यामुळे नर्सला करावी लागली, सायंकाळी 06 वाजल्यापासून सकाळी 06:30 वाजे पर्यंत नियुक्त डॉ. जागेवती हजर नव्हते, असे बाकीचा स्टाफ आणि नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
रुग्णाचे नातेवाइकांबरोबरच जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी ही रुग्णालयात ताबडतोब हजरी लावली, त्यावेळी डॉक्टरांचा उद्धटपणा पोलिसांसमोर उघडकीस आला.
नातेवाईकांनी सांगितले कि रात्री 02:00 वाजता ऑपरेशन थिएटरच्या बाजूला उभे असता, तेथील ऑपरेशन थिएटर मध्ये नुकतेचडिलिव्हरी झालेल्या नातेवाईकांकडून 3000 रुपयांची मागणी हि यावेळी करण्यात आली, त्याबद्दल डॉक्टरांना विचारले असता आम्ही स्वखुशीने पैसे घेत असल्याचे पोलिसांसमोर मान्य केले.
सादर झालेल्या घटनेबद्दल नातेवाईक आक्रमक होऊन पेशंटला न्याय मिळावा यासाठी अलिबाग पोलिस स्टेशन मधील पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करावा आणि दोशी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तक्रारदार रुग्णाचे पती रुपेश काटले, जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, जयवंत थळे, नंदकुमार काटले, अशोक वारगे, रोशन काटले, रामदास पाडगे, उदय काटले, स्वप्नील म्हात्रे, अशोक जाधव, नागेश काटले, शैलेश काटले, अभय जाधव, प्रसाद जाधव, सागर मांडवकर, प्रवीण काटले व इतर नातेवाईक उपस्थित होते.