दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणार : संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पनवेल तालुका कार्यकारिणी जाहीर

 

सागर पवारजिल्हा प्रतिनिधी रायगड

पनवेल : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघाची पनवेल तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बोलत होते, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणार असून पत्रकार त्यांचे कुटुंबीय यांचे कल्याण उत्कर्षासाठी सातत्याने काम करीत असून ते अविरतपणे सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या कोकण संपर्क प्रमुखपदी संतोष वाव्हळ, रायगड जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग) संतोषआमले, नवी मुंबई कार्याध्यक्ष आनंद मेस्त्री, पनवेल तालुका महिला अध्यक्षा शाहीन शेख, तालुका संपर्क प्रमुख सुरेश भोईर, तालुका संघटक मच्छींद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन तांबे, तालुका सचिव सल्लागार ॲड. वसीम शेख आदी पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारिता हा व्यवसाय म्हणून करू नये तर आवड म्हणून करावी असे प्रतिपादन केले. संघाचे महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे यांनी आपण पत्रकारिता करीत असतांना कुठे संकटात सापडलात तर संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास दिला.

नवनिर्वाचित कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ यांनी संघटना वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उत्तर विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आमले यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार असून संघटनेचे बळकटीसाठी आम्हीप्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. पनवेल तालुका महिला अध्यक्षा शाहीन शेख यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुंदर असे निवेदन कैलास रक्ताटे यांनी केले.

यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी अश्विनी म्हात्रे, आशा घालमे, पुनम शिगवण, शीतल पाटील, निशा माने, विलास गायकवाड, राजपाल शेगोकार, धनाजी पुदाले, गोरक्षनाथ झोडगे, काशिनाथ आमले, राकेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे