कंधार प्रतिनिधी | कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान,कंधार व लाईव्ह हिंदवी बाणा न्यूज चॅनेलच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा-2021. दि:-30 एप्रिल 2022 रोजी यांच्या वतीने जिल्ह्यातील व राज्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार जाहीर करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात कोविड-19 च्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्याना” कोविड योद्धा” या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात मा.ना. अशोकराव चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड यांच्या शुभहस्ते डॉ. सूर्यकांत लोणीकर वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय कंधार यांना सन्मानित करण्यात आले .
एक सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.मनोहर धोंडे साहेब व प्रमुख अतिथी विधान परिषद गटनेते मा.आ.अमरनाथ राजूरकर मा.आ.ईश्वरराव भोसीकर मा.आ.शंकर आण्णा धोंडगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
कोविड योद्धा सन्मान कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. सूर्यकांत लोणीकर यांना सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी यांना देण्यात येतो .यामध्ये कंधार ग्रामीण रुग्णालयाचे,अधिकारी, व आरोग्य कर्मचारी यांनी अहोरात्र सेवा दिली ,व सफाई कर्मचारी यांनी सर्व धोका पत्कारून मोलाची सेवा दिली. टीम वर्कमुळे हे सर्व साध्य झाले असे वैद्यकीय अधिक्षक यांचे मत आहे. जवळपास 1000 हजार रुग्ण ऍडमिट होते त्यातील काही रुग्ण गंभीर होते बरेच रुग्ण होम कोरोनटाईन होते वेळेवर संदर्भित केलेले रुग्ण चांगले झाले वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय अंतर्गत उपचार दिलेल्या रुग्णामध्ये एकही मृत्य नाही , ही विशेष बाब होय…पुरस्काराचे सर्व श्रय अधिकारी व कर्मचारी यांना जाते. प्रसारमाध्यमानी रुग्णामध्ये व जनतेमध्ये नेहमीच सकारात्मक संदेश दिला गेला जिल्हाधिकारी मा.डॉ. विपीन इटनकार साहेब व जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. निळकंठ भोसीकर साहेब यांनी सतत मार्गदर्शन करून कंधार कोविड अंतर्गत कामा बाबत नेहमी समाधान व्यक्त केले.सततच्या मार्गदर्शनामुळे कंधार जनतेमध्ये भीतीचे वातावरण नव्हते .
या सर्व गोष्टीचा विचार करून लाईव्ह हिंदवी बाणा न्यूज चॅनेलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान, व आयोजन व नियोजन करते कंधार. या सर्वांना धन्यावद देतो. माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचा अतीशय आजन्म आभारी आहे.व यापुढे ही कंधार परीसरातील जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याची हमी दिली.