नांदेड
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त कामजळगा येथे लिंगायत समाज मेळावा शरण संमेलन आयोजन.!!
एम.बी. कवठेकर...
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेङ तालुक्यातील मौजे कामजळगा येथे दि. ४ मे रोजी दापका राजा ते कामजळगा या रोडवर बसव अनुभव मंङप येथील नियोजीत जागेदर ता. मुखेड जि. नांदेड येथे लिंगायत धर्म संस्थापक जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्ताने परमपुज्य श्री. डॉ. बसवलिंग पट्टद्येवरू आप्पाजी हिरेमठ संस्थान भालकी जि. बिदर कर्नाटक यांच्या पवित्र सान्निध्यात लिंगायत धर्मियांचा व बहुजन समाजाचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बी. आर. एस. पक्षाचे तेलंगना खासदार भिमराव पाटील, आमदार सचिन अहीर ( शिवसेना नेते मुंबई ), मा.आ. देवेंद्र भुयार हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणुन …
मा.सौ.अंजलीताई बाळासाहेब आंबेडकर, मा. प्रा. नैनाताई बच्चुकडू, बहुजन चळवळ व महात्मा बसवण्णा बसवण्णा व सर्व धर्म समन्वय शस विषयावर बोलनार आहेत. तसेच या कार्यक्रमास गुरुवर्य १०८ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर , ङाॅ.विरुपाक्ष शिवाचार्य गाणाचार्य मठ संस्थान मुखेङ, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर, एकनाथ नामदेव महाराज उमरज, नामदेव महाराज दापकेकर इ.उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मनोहर पटवारी दिलीप पाटील बेटमोगरेकर, भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर मन्मथअप्पा किडे अविनाश भोसीकर हे उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमाचे आयोजन राहूल . नावंदे दिग्रसकर बसव फाऊंडेशनच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवला जात आहे.!!