दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

रायगड

श्रीवर्धन येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

श्रीवर्धन नाभिक समाजाचे अध्यक्ष विलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यतिथी साजरी

शिवराज संदीप चाफेकर यांची श्रीवर्धन सलून संघटना अध्यक्षपदी निवड

सागर पवार – रायगड जिल्हा प्रतिनिधी

श्रीवर्धन : नाभिक समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी अनंत चाफेकर यांच्या निवास स्थानी मोठया उस्तवात साजरी करण्यात आली. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्रीवर्धन शहरातील नाभिक संघात श्री संत सेना महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन पूजन करण्यात आले, संत सेना महाराज पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात येत आहे.

श्रीवर्धन नाभिक समाजाचे अध्यक्ष विलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यतिथी साजरी करण्यात आली, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, पोथीपूजन देखील करण्यात आले, अल्पपोहार व जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनचे यावेळी गुणगौरव करून, शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिवराज संदीप चाफेकर यांची श्रीवर्धन सलून संघटना अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल अध्यक्ष विलास केशव कदम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सेना महाराज पुण्यतिथी च्या योगा-योगाने श्रीवर्धन नाभिक समाजाचे जेष्ठ सल्लागार अरुण केशव कदम यांनी 71व्या वर्षात पदार्पण केले असून सलून संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवराज चाफेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे