दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

पुणे

मेंगडेवाडीमध्ये कै. यमुनाबाई रामचंद्र मेंगडे यांना हरीत श्रद्धांजली

धनंजय मेंगडे पूणे जिल्हा प्रतिनिधी

मेंगडेवाडीमध्ये “ओमकारेश्वर हिल ” या ग्रुप अंतर्गत होणार्‍या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये कै.यमुनाबाई रामचंद्र मेंगडे (वय ६९) यांच्या स्मरणार्थ ५ रोपांचे वृक्षारोपण करून हरीत श्रद्धांजली देण्यात आली. त्यावेळी प्रामुख्याने फक्त देशी रोपे लावण्यात आली वड, चिंच, अश्या रोपांचा समावेश आहे. त्यावेळी ही झाडे भविष्यात नेहमीच आमच्या आईच्या स्मृतींना उजाळा देतील अशी भावना त्यांचा मुलगा  श्री.उत्तम रामचंद्र मेंगडे (शिक्षक ) यांनी व्यक्त केली.  त्यावेळी त्यांची मुले-मुली, सुन, नातू  उपस्थित होते. वृक्ष संवर्धनासाठी लागणारा  खर्च त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.हनुमंत सावळेराम टाव्हरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे