देशरत्न न्युज प्रतिनिधी – सध्या महाराष्ट्राच्या लोककला परंपरेत नामांकित ठरत असलेल्या पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथील दि. १०. नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकनाट्य तमाशा व लावणी महोत्सवात या वर्षी पुन्हा लता–लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशाला पुन्हा सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहेत. आहे, अशी माहिती या तमाशा मंडळाचे संचालक जयसिंग कांबळे बस्तवडेकर यांनी दिली.बेल्हे येथील साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप यांच्या पुढाकाराने गेल्या दहा वर्षापासून संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हा तमाशा महोत्सव आयोजित केला जातो.या वर्षी दि. १० ते १२ नोव्हेंबर रोजी होणाया या महोत्सवात पाच तमाशा फड आणि तीन लावणी शो आपले सादरीकरण करणार आहेत.
लता-लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशाची या तमाशा महोत्सवासाठी. यासाठी जोरदार तयारी सुरू असून नवीन पारंपरिक लावण्या, सुरवातीचा लहरा, छकडी, वगनाट्य यांची नव्याने मांडणी लता-लंका करीत आहे या साठी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ तमाशा कलावंत व वगनाट्य लेखक मुरलीधर शिंदे बोरगावकर हे काम करीत आहेत.
गतवर्षी बेल्हे येथील तमाशा महोत्सवात लता-लंका पाचेगावकर यांचा तमाशा फड पारंपरिक सादरीकरणात अग्रेसर ठरला होता. त्यामुळेच या वर्षी पुन्हा एकदा या लता-लंका पाचेगावकर तमाशा फडास पुन्हा संधी मिळाली आहे. त्यामुळे या तमाशा मंडळाची जोरदार तयारी सुरू आहे.