दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील कारखाना प्रशासन व सर्वपक्षीय व शेतकरी तहसील दार समवेत बैठक वादळी

बाळासाहेब पिसाळ

नेवासा प्रतिनिधी।एक रकमी एफ आर पी प्रमाणे 3100 भाव कारखान्याने द्यावा या मागणी करतात वादळी धरली आज तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली ऊसदर ठरवण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मुळा ज्ञानेश्वर गंगामाई या साखर कारखान्याचे प्रतिनिधी व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी जिल्हा सचिव अंकुश काळे शेतकरी संघटनेचे रामदास कोरडे त्रिंबक भदगले मनसेचे संतोष गव्हाणे मीराताई गुंजाळ तालुक्यातील इतर शेतकरी व सभासद यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली यामध्ये शेतकऱ्याकडून करण्यात आली की एफआरपीप्रमाणे पहिली उचल एक 3100 रुपये प्रति टन भाव कारखान्याने द्यावा व मागील हंगामातील उपपदार्थापासून 200 रुपये प्रति टन अनुदान शेतकऱ्यांना द्यावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी प्रत्येक कारखाना हा वजन काट्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट करतो त्यामुळे खाजगी वजन काट्यावरती शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करण्याची परवानगी या सर्व कारखान्याने द्यावी. व केंद्र सरकारकडून मागील वर्षी आलेले ऊस तोडणी अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 109 रुपये जे ठेवीत जमा केलेले आहे ते तात्काळ शेतकऱ्याला खात्यात वर्ग करावे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली यावरती कारखाना मॅनेजमेंट तीनही कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर व शेतकरी सर्व पक्षीय नेते यांच्यात जोरदार चर्चा झाली त्यावरती तहसीलदार सुराणा साहेब यांनी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले अडचणीच्या काळामध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे हातात तोंडाला आलेले पिके वाया गेलेले असताना या सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दमडीही दिली नाही म्हणून तहसीलदार कार्यालय समोर दीपावली सणाच्या दिवशी शेतकऱ्यांना चटणी भाकर खावी लागली लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याने 109 रुपये प्रमाणे एफआरपीचे दुसरे पेमेंट केले परंतु नियमानुसार एफआरपी मधील हे पेमेंट परस्पर डिस्टिलरी विस्तारित करण्यासाठी ठेवीमध्ये रूपांतरित करून घेतले त्यासाठी कुठल्याही शेतकरी सभासद यांची पूर्व परवानगी व चर्चा केलेली नसताना ते पेमेंट वजा करून घेतली एफ आर पी मधील पेमेंट वजा करता येत नाही तरीही कारखाना मॅनेजमेंटने कुठल्या नियमाला धरून ते केले यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कारखाना प्रशासनाला धारेवर धरले व त्वरित 109 रुपये प्रमाणे केलेली पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावे अन्यथा कारखान्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे सूचना तहसीलदार यांना दिल्या कारखाना मॅनेजमेंट व शेतकरी यामध्ये खूप प्रमाणामध्ये चर्चा झाली व यंदाच्या गळीत हंगामासाठी एफ आर पी प्रमाणे किती पेमेंट मिळेल याविषयी संचालक मंडळास ची बोलणी करून दोन-तीन दिवसांमध्ये यावर्षीची एफ आर पी किंमत जाहीर करू असे आश्वासन यावेळी कारखान्याची प्रतिनिधी यांनी दिले यावेळी तालुक्यातील विविध पक्षीय संघटनांचे पदाधिकारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद जाधव भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे उपाध्यक्ष राजेश कडू कामगार आघाडी तालुका अध्यक्ष विवेक नन्नवरे भाजपा तालुका उपाध्यक्षअण्णासाहेब गव्हाणे दत्तू भाऊ काळे देवेंद्र काळे मनसेचे सचिन गव्हाणे बाळासाहेबांचे शिवसेना चे नवनियुक्त तालुका अध्यक्ष श्री सुरेश डीके बापूसाहेब दारकुंडे किरण जावळे अब्दुल पठाण रामेश्वर तनपुरे नानासाहेब शेंडे तालुका मीडिया संयोजक आदिनाथ पटारे सहसंयोजक गणेश मुरदरे नेवासाचे माजी सरपंच सतीश गायके सामाजिक कार्यकर्ते भास्कराव कगनरे व इतर कार्यकर्ते व शेतकरी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे