आज दिनाक 16 मे रोजी पाटस या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2565 व्या जयंती निमित्त प्रथमच विपश्यना साधनेचे आयोजन केले गेले होते. या मध्ये तीस साधकांनी सहभाग घेऊन 3 तास जीवन जगण्याचे कौशल्य आत्मसात करून घेतले . ही विपश्यना साधना सकाळी 7 ते 10 या वेळा मध्ये करण्यात आली.
त्या मध्ये काही साधकांनी त्याची मते मांडली. इथून पुढे ही या ठिकाणी असेच 10 दिवसाचे निवासी वर्ग सुरू करावेत अशी इच्छा व्यक्त केली .आयु. डोबाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विपश्यना साधना घेण्यात आली .
दुसऱ्या सत्रात त्रीशरण पंचशील सुप्त पठण हे मोरे गुरुजी यांनी घेतले . त्या नंतर चहा आणि नाष्टा याची सोय करण्यात आली होती .
अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडली अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . 10.30 वाजता बुद्ध पूजा घेण्यात आली . बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयी माहिती देण्यात आली
बुद्ध आणि धम्म जगामध्ये किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याची कोणाला ही गरज पडत नाही म्हणून बाबासाहिबानी लिहिलेले संविधान सर्वांना सुखी आणि समाधी ,जीवनाची न्याय समता, कुणाला हक्कापासून वंचित ठेवत नाही हे खरं हे विश्वशांती विहार हे भविष्यात पर्यटना स्थळ व्हावे या साठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असेही विहाराच्या अध्यक्षांनी सांगितले ,
कार्यक्रमास उपस्थित दादा मोरे, संस्थेचे सचिव सविता पानसरे, वसंत पानसरे ,विजय पानसरे आनंत पानसरे मा शेळके सर ,भागवत गायकवाड, शशिकांत काकडे, तेजस पानसरे सनी पानसरे ,अपूर्व पानसरे,गौतम पानसरे, किसन पानसरे व अनेक महिलां वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता शेवटी सर्वांचे आभार मा शिंदे मामा यांनी मांडून विहाराचे देखभाल करणारे राहुल निकाळजे व सौ यांचे आभार मानले व सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला