दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरनांदेडनिधन-वार्ताब्रेकिंग

“विजेच्या तारेला गळफास घेऊन युवकांचा मृत्यू “

सरसम येतील निधन वार्ता

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम (बु ) येथील युवकाने दि २६ जानेवारी च्या रात्रीच्या वेळेला विद्युत पोलच्या ताराला कंबर पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि आत्महत्या कोण्या कारणाने झाली हे अजूनही अस्पष्ट आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथे रोजंदारीवर आपला गुजरान करणारा युवक मानसिक त्रासाला कंटाळून त्याने २६ जानेवारी रात्रीच्या वेळेला सरसम गावातील महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला बीएसएनएल टॉवरच्या जवळील विद्युत पोलच्या ताराला कंबरपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत तरुणाचे नाव विकास नामदेव मंडलवाड (वय २३) असे आहे.

गावातून बाहेर जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर लगतच बीएसएनएलचे टावर आहे त्या टावर लगतच मेन रोडला असलेल्या विद्युत पोलच्या ताराला कंबरपट्टे च्या सहाय्याने अनपेक्षित रित्या घेतलेली ही साऱ्या गावकऱ्यांना सुन्न करणारी आहे. ही झालेली आत्महत्या सर्वांना सुन्न करणारी आहे. या प्रसंगामुळे मयताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे सरसम गावावर शोकाकळा पसरली आहे. व मयत विकास उर्फ सोनु याचा भाऊ बालाजी नामदेव मंडलवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहा. पोलिस निरीक्षक बालाजी महाजन समवेत इतर पोलिस घटनास्थळी रवाना झाले असुन मयत विकास चे प्रेत विज वितरण कंपनीचे लाईनमन बालाजी जाधव यांनी विज पुरवठा बंद करून प्रेत खाली उतरण्यास सहकार्य केले. त्यानंतर पोलिसांनी प्रेताचा इंक्वेस्ट पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी कामी वृत्त लिही पर्यंत हिमायतनगर ग्रामिण रूग्णालयात पाठवण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

प्रभु साहेबराव कदम वाघीकर दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी

दैनिक देशरत्न न्युज पत्रकार प्रभू कदम वाघीकर बातम्या देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करा +918411985876

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे