नांदेड
मुखेड तालुक्यात अवैध वृक्षतोड वन विभागाचे दर्लक्ष…पर्यावरणास धोका…
प्रतेक क्षेञात लहान मुलापासुन ते अगदी मोठ्या पर्यत प्रशासकीय यंत्रणा लहानमुलांना हाताशी घेऊन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत आहे . मात्र त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लावलेली झाडे पण जगत नाहीत .याला जबाबदार कोण असा प्रश्न पङत आहे..
तालुक्यातील पर्यावरणाला पूरक असे वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर असून या बाबींकडे वन विभागातील कर्मचारी अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
वृृृृृृृृृक्ष जगली तर ती तोडली जात असल्याने वनाचा टक्का वाढत नाही प्रशासन झाडे जगविण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत असतानाच दुसरीकडे त्यावर लाकुड तोडणाऱ्यांसह वनाचे संरक्षण करणाऱ्यांमुळे पाणी फेरले जात आहे .
तालुक्यातील परिसरात ट्रक & ट्रॅक्टर भरून जातात वनविभागाच्या दुर्लक्षामुळे लाकूड तोडीला चालना मिळाली आहे . खुलेआम लाकूडतोड चालू आहे . व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात झाडे घेऊन ती तोडून भरपूर नफा कमवीत आहे . दररोज लाकडाचे वाहणे भरून जात असल्याने वन विभागाने हा भाग वाळवंट बनविण्याचा ठेका घेतला काय ? असा संतप्त सवाल वृक्षप्रेमींतून विचारला जात आहे .
तालुक्यातील जांब बु येवती, धामणगाव, मुक्रमाबाद , बार्हाळी , बेटमोगरा , कामजळगा, दापका,सावरगाव पि.. मुखेङ ता. अनेक परिसरात कुर्हाडबंदीचा कायदा धाब्यावर बसवून प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे..
एका रात्रीत कडुनिंब कमी वनक्षेत्र राहील्याने जिल्ह्यात कुन्हाडबंदी करण्यात आली आहे . मात्र कुन्हाडबंदीचा कायदा कागदावरच असल्याचे चिञ दिसत आहे तालुक्यातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे . वृक्ष तोडण्यासह वाहतुकीचा सर्व प्रकार भरदिवसा & रात्री चालतो …
वृक्षतोड करणारे रात्री मशिनरी वापरुन झाडे तोडतात . ही झाडे दुसऱ्या दिवशी रात्री वाहना मधून वाहतूक करून एका ठिकाणाहून दुसरीकडे नेल्या जात आहे
लाकूड घेऊन भरधाव जाणारे ट्रक अपघातास कारणीभूत होण्याची शक्यता आंबा , चिंच , बोर , जांभूळ यासह इतर जातीच्या झाडांची बेसुमार वृक्षतोड केली जात आहे .
अनेक मोठ्या गावांमध्ये लाकूड माफियांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत . तोडलेल्या झाडांची लाकडे वाहणामध्ये भरुन सर्रासपणे परराज्यात पाठविली जात आहे . हा सगळा प्रकार वन व महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून केला जात आहे .का ?असा प्रश्न पर्यावरण प्रेमिना पङला आहे. आंबा , चिंच, बाभळ यांसारखे वृक्ष तोङ सरास चालू आहे…वक्षांची तोङ थांबलिच पाहिजे …असा प्रश्न पर्यावरण प्रेमिला पङला आहे…