दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपरपुणे

पाटस येथे विश्वशांती बुद्ध विहारामध्ये भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाटस प्रतिनिधि :- गणेश गायकवाड

 पाटस* : १४ एप्रिल जवळ आली की सर्व बहुजनांना मध्ये आनंदाचे वातावरण तयार होते हा आनंद म्हणजे मोठा जागतिक  सणच आहे त्या दिवशी गोडधोड जेवण करून  ही जयंती मोठ्या उत्साहात  साजरी केली जाते

 जगभरात ही जयंती साजरी होत असते .   महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विश्वशांती बुद्ध विहार, पाटस या ठिकाणी ही   जयंती चे आयोजन करण्यात आले होते .  मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणामध्ये भीम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आसपासच्या परिसरातील   भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकरूनी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची पेटती ज्योत प्रज्वलित करून घेऊन जाण्याची परंपरा आहे . ही ज्योत दौंड तालुक्यातील  विविध गावातील भीम सैनिक दरवर्षी ज्योत प्रज्वलित करून घेऊन जातात 

या वर्षी ही  सकाळी ७ वा. पारगावच्या भीमसैनिकांना ज्योत प्रज्वलित करून देण्यात आली.   त्यानंतर १०.३० वाजता  जयंतीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ११ वा.

रोटी गावचे भीम सैनिक व  वरवंड च्या भीम सैनिक यांनी हजेरी लावली  हे भीम सैनिक ज्योत नेहण्यासाठी  विहारामध्ये आले होते . त्यांनाही ज्योत प्रज्वलीत करून देण्यात आली.

दरम्यान,अनेक मान्यवरांनी आपली मते व विचार सर्वापुढे मांडले. या कार्यक्रमाला पाटस पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे  आवर्जून कार्यक्रमास  उपस्थित राहीले  त्यांनी भीम सैनिकाना  चांगले मार्गदर्शन केले.  जाती-पातीचे व धर्माचे राजकारण न करता महापुरुषांचे विचार आजपासूनच आचरणात आणा , असे असे मत त्यांनी व्यक्त केले .मा.सरपंच संभाजी खडके, डॉ .सोनवणे,  संभाजी देशमुख व पत्रकार संजय सोनवणे ,पत्रकार राजेन्द् झेंडे व  इतर प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने  उपस्थित होते. हा कार्यक्रम  विहाराचे अध्यक्ष सुधीर पानसरे, प्रशांत (भाऊ)पानसरे ,वसंत पानसरे,  सचिव सविता पानसरे,  विजय पानसरे,  भागवत गायकवाड, प्रबुद्ध पानसरे  , तेजस पानसरे,  सनी पानसरे ,प्रमोद आखाडे, सुयश पानसरे व   विश्वशांती बुद्ध विहाराचे अन्य कार्यकर्ते  यांनी विशेष कार्य केले .स्नेहभोजन करून कार्यक्रम    संपविण्यात आला  .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे