नांदेड
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते..!!
एम बी कवठेकर....
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने झाली..
प्रभातफेरीतील मुख्य आकर्षण म्हणजे:-
प्रवेश घेण्यासाठी या म्हणून दवंडी देण्यात आली. मुलांनी शाळेला या असे नारे दिले.
शाळेतील कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डोंगरे साहेब यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले…
यावेळी प्रवेश पात्र बालकांचे औक्षण करून त्यांची नाव नोंदणी करून घेण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डोंगरे साहेब हे होते. तसेच श्री रणवीर डोंगरे (उपसरपंच अटकळी) ,श्री वैभव मुरके ,श्री मारुती मामा पोलकमवाड (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष),विषय तज्ञ श्री हलगरे सर व श्री राठोड सर (पंचायत समिती बिलोली) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते…
कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक श्री द्याडे सर यांनी केली…
श्री हालगरे सर श्री राठोड सर श्री मठदेवरू सर यांनी तद्नंतर प्रत्येक स्टाॅलवरील संकल्पना समजून घेण्यासाठी प्रात्यक्षिक सादर केले.मुलांचा भावनिक, सामाजिक, बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी पालकांचा सहभाग कसा असावा उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
वैभव मुर्के यांनी शाळेमध्ये होत असलेल्या नवनवीन उपक्रमाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डोंगरे सर आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये शालेय अभ्यासाव्यतिरिक्त जीवनामध्ये खेळालाही महत्त्व आहे हे सांगितले तसेच ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आवड आहे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शाळास्तर किंवा केंद्र स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असेही सुचवले यावेळी गावातील अंगणवाडी कार्यकर्ती यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सलगरे सर यांनी केले आभार प्रदर्शन सौ मुनेश्वर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री द्याडे सर ,श्री मठदेवरु सर ,सलगरे सर ,मारतळे सर, चव्हाण सर ,सौ मुनेश्वर मॅडम, मारमवार मॅडम, शहनाज मॅडम, खैरगावे मॅडम, इडलवार मॅडम तसेच गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस , पालकवर्ग, प्रवेश पात्र मुले ,गावाचे सरपंच, उपसरपंच,इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…