ब्रेकिंग न्युज ! अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले – आरोपींना जामीन मंजूर
प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
अहमदनगर : राहुरी पोलिस स्टेशन येथे भा. द. वी. कलम 363 , 366 या कलमाअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींना अहमदनगर येथील मा सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टाने नुकताच जामीन मंजुर केला आहे
मौजे देहरे ता जि अहमदनगर येथील आरोपी युवक त्याचे आई वडील व इतर 3 आरोपी यांचे विरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले बाबत मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपी यांचे विरुद्ध भा. द. वी कलम 363 , 366 अन्वये गुन्हा दाखल केला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपी युवक व त्याचे आई वडील यांना अटक केली आरोपींनी नियमित जामिनी करिता अहमदनगर येथील मा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जाची नुकतीच सुनावणी झाली आरोपीच्या वकिलांनी फिर्यादी मुलगी सज्ञान असल्याबाबत कागदपत्र दाखल करून मुलीने वडिलांच्या दबावाखाली खोटा जबाब दिल्याचा युक्तिवाद केला आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा सत्र न्यायालयाने आरोपींना अटी व शर्ती वर नुकताच जामीन मंजुर केला आहे आरोपीच्या वतीने ॲड प्रशांत मोरे व ॲड सुभाष वाघ यांनी कामकाज पाहिले त्यांना ॲड देवा थोरवे , ॲड स्नेहल सरोदे , ॲड अंशबापु पुंड , ॲड एच डी सपकाळ , ॲड सविता शिंदे यांनी सहकार्य केले