अहमदनगरई-पेपरगुन्हेगारीब्रेकिंग
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका
दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर शहाजी मांडलिक
अहमदनगर प्रतिनिधी :- आज रोजी दिनांक १०-१-२०२३ रोजी पाथर्डी पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा आयपी सी ३७६ , ३६३ पॉस्को ३ ,४ ,११ (४) ,१२ क्रिमिनल नंबर आय ३१५ / २०२० स्पेशल केस नंबर २४४/२०२० मधील आरोपीची अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे . सदर केस मध्ये सरकारी पक्षाने तपासलेल्या साक्षीदारांच्या कथनामध्ये विसंगती आल्याने सदरच्या विसंगती आरोपी पक्षाचे वकिलांन कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या व सदर केस खोटी आहे असा युक्तिवाद व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने ॲड प्रवीण पालवे यांनी कामकाज पाहिले व त्यांना ॲड भारत कचरे पाटील यांनी सहकार्य केले.