दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेडब्रेकिंग

पत्रकाराला फोनवरून अश्लील शिवीगाळ करून धमकी देणाऱ्यावर कारवाई करा

हदगांव येतील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली

हदगांव दि.१०हदगांव येतील पत्रकार गजानन जिदेवार यांनी दि.८ जानेवारी २०२३ रोजीच्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये शेतमजूरवाडी तामसा येतील तामसा ते उमरी रस्त्यालगत असलेल्या अवैध मुरुम प्रकरणाची बातमी प्रकाशित करण्यात आली व ती बातमी सोशल मीडियाच्या (व्हाॅट्स ॲप ग्रुप) माध्यमावर टाकण्यात आली. ती नायगाव येथील पत्रकार ग्रुप वर टाकण्यात आली होती.यात अवैध मुरूम उत्खनन करून साठा करणाऱ्या ठेकेदाराने ती बातमी पाहिली व ‌‌तुला पैसे  दिले नसल्याने तु बातमी लावली  म्हणून त्या ग्रुपवर प्रतिक्रिया दिली म्हणून पत्रकार गजानन जिदेवार यांनी ग्रुपवर प्रतिक्रिया न देता फोन करून विचारणा केली असता .त्यांने तु बातमी का लावली म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून मीच ते मुरुम टाकला  आणि तु बातमी घेतो म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुला पाहतो काय करायचे कर म्हणून धमकी देण्यात आली. म्हणून संबंधित धमकी देणाऱ्या ठेकेदार साईनाथ देशमुख रा.नायगाव तालुका.नायगाव जिल्हा.नांदेड यांनी बातमी का लावली म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.म्हणुन साईनाथ देशमुख यांच्या विरोधात हदगांव येतील पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीची तक्रार उपविभागीय अधिकारी हदगांव व तहसीलदार तहसील कार्यालय हदगांव यांच्याकडे देण्यात आली.या वेळी पत्रकार पंडित पंतगे, संजय राहुलवार, भगवान शेळके, नंदकिशोर सोमणकर, विकास राठोड, धर्मराज गायकवाड, गजानन सुकापुरे, महेंद्र धोंगडे, प्राध्यापक राजेश राऊत,एस एस खांडेकर, अभिजीत देवसरकर , दयानंद कदम, राष्ट्रदिप वाढवे, केदार दारमा, प्रविण दुधारे,शेख शेहबाज, गजानन गिरी, कमलाकर बिरादार, मारोती काकडे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

प्रभु साहेबराव कदम वाघीकर दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी

दैनिक देशरत्न न्युज पत्रकार प्रभू कदम वाघीकर बातम्या देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करा +918411985876

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे