दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्तानांदेड

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरीया खतांचा वापर करावा

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यास जानेवारी महिण्यात युरिया खताची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात 15 हजार मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आजच्या स्थितीला आयपीएल कंपनीचे 1800 मे. टन व नागार्जूना कंपनीच्या 2200 मे. टनच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्या दोन दिवसांत जिल्ह्यात वितरीत होतील. शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच युरिया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे .

आपल्या जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी दाळवर्गीय हरभरा पिकास युरिया खताचा वापर टाळावा जेणे करुन पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही व खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा युरिया खतास पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल. पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमीनीची पोत टाळता येईल व पिकांना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

प्रभु साहेबराव कदम वाघीकर दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी

दैनिक देशरत्न न्युज पत्रकार प्रभू कदम वाघीकर बातम्या देण्यासाठी कॉल किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करा +918411985876

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे