अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर-पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६ सह ३४ या कलमान्वये दाखल गुन्हयातील आरोपीस अहमदनगर येथील मा. सत्र न्यायाधिश साहेब यांचे कोर्टाने जामीन मंजुर केला आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीगत-
कळपिंप्री गावातील फिर्यादी श्रीकांत बबन बुळे हे दि. ०४/१२/२०२२ रोजी सकाळी ११:०० वा. कळसपिंप्री गावातील मारुती मंदीरात दर्शन करुन बाहेर आले असता आरोपी नागेश श्रीधर चेढे व त्यांचे वडील श्रीधर साहेबराव चेढे, रा. कळसपिंप्री यांनी फिर्यादीस चाकुने जबर मारहाण करुन गंभीर केल्याबाबत फिर्यादीने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्हयामध्ये पोलीस तपासात नागेश श्रीधर चेढे व श्रीधर साहेबराव चेढे या आरोपींचे नावे निष्पण्ण झाली होती. यातील नागेश श्रीधर चेढे हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे,दरम्यान आरोपी नं. २ श्रीधर साहेबराव चेढे याने जामीन मिळण्याकरीता अहमदनगर येथील मा. सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जांची नुकतीच सुनावणी झाली. आरोपींच्या वकीलांनी सदरचा गुन्हा खोटा असल्याचा युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. सत्र न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तीवर जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. देवा थोरवे यांनी युक्तीवाद केला. त्यांना ॲड. महेश घाडगे यांनी सहकार्य केले