दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

मराठा आरक्षण पुन्हा पेटले,सर्व पक्षीय मंञ्यानां भावपूर्ण श्राद्धजली…मराठा क्रांती मोर्चा चे अनोखे आंदोलन

नेवासा प्रतिनिधी।मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. त्यामुळे मराठी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत.आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या प्रश्‍नाला अग्रक्रम देवून तो पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर च्या वतीने सर्व पक्षीय मंञी,खासदार,आमदार यांना भावपूर्ण श्राद्धजली असे बॅनर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून,मराठा क्रांती मार्चाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने बुधवार रोजी हे बॅनर व्हायरल करून हे आंदोलन केले आहे. या वेळी आक्रोशही व्यक्त केला. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 40 वर्षांपासून आरक्षणासाठी सकल मराठा समाज संघर्ष करत आहे. सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली. मात्र, आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही. यामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. त्याचा भडका 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात उमटला होता. त्यानंतर 58 मुक मोर्चे निघाले. काँग्रेस व भाजप सरकारने आरक्षण दिले. त्रूटी असल्याने तेही सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता पुन्हा आयोग नेमून सर्वेक्षण केले जात आहे. सरकारच्या वतीने वेळखाऊ धोरण सुरु असल्याने मराठा तरूणांचा संयम सुटत चालला असून मुंबई येथील आजाद मैदानातील आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला आहे असे नवले यांनी सांगितले.आंदोलन करून आठ दिवसात सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबई येथे गनीमी काव्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा, नवले पाटील यांनी दिला आहे. या वेळी मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर चे समन्वयक कमलेश नवले पाटील,जीवन ज्योत फाऊंडेशन चे अक्षय बोधक,आप्पासाहेब आरगडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे