दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगरब्रेकिंग

त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याची वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या कि हत्या?

यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक संस्थेत आत्महत्या केल्याचे प्रकार...

नेवासा प्रतिनिधी। नगर-संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे बारावीचे शिक्षण घेत असलेल्या प्रताप मुछडा पावरा या विद्यार्थ्याने वसतीगृहामध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नेवासा पोलीस स्टेशनला मनोज म्हतारदेव शेंडे या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या रेक्टरने खबर दिली. यामध्ये लिहिले आहे की, प्रताप मोछडा पावरा (17,रा. खरवड, पोस्ट मांडवा, ता.धडगाव, जिल्हा नंदुरबार) हा 6 वर्षापासून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या महाविद्यालयात 12वीमध्ये शिकत होता. तो सावरकर हॉस्टेलमध्ये रूम नंबर- 08 त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे राहत होता.29 जुलैपासून तो आजारी असल्याने वर्गामध्ये न जाता औषधोपचार घेऊन हॉस्टेलमध्येच आराम करत होता.

आज दुपारी एकच्या सुमारास मेसमध्ये असताना साहील सोनवणे हा विद्यार्थी प्रतापला जेवायला येण्यासाठी बोलवायला गेला. तेव्हा प्रताप मोछडा पावरा याला छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्याचे सांगितले. त्याने ही माहिती वसतीगृह प्रमुख शिवाजी झांबाडे यांना सांगितली. त्यांनी तात्काळ खोली क्रमांक 8मध्ये जाऊन राजेंद्र कात्रज, विक्रम पावरा या मदतीनसांच्या सोबतीने प्रतापला खाली उतरवले. त्यानंतर तात्काळ त्याला महाविद्यालयाच्या वाहनाने औषधोपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय, नेवासा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे