अहमदनगर
पिंप्रीशहाली येथील १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी होणार का?-नवथर
नेवासा प्रतिनिधी। नेवासा तालुक्यातील पिंप्रीशहाली ग्रामपंचायत येथील १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नरेंद्र नवथर यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.सदर योजनेत रस्ता कॉंक्रीटिकरण,वॉटर फिल्टर्स,अंडर ग्राऊंड गटार,लाईट फिंटींग,एल-ई-डि-बल्ब, पेव्हर ब्लॉक, सी-सी-टी-ही कॅमेरे, जिल्हा परिषद शाळेसमोरील सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर कामाची सखोल गुणवत्ता-चौकशी करण्यात यावी असे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की सदर कामाची चौकशी न झाल्यास येत्या पंधरा दिवसात छञपती युवा सेना वतीने पंचायत समिती समोर प्रशासनाचा दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येईल.या वेळी छञपती युवा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र नवथर,जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले या वेळी उपस्थित होते.