दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

जि.प.कें.प्रा.शा. चितेगाव शाळेत दीपोत्सव उत्साहात साजरा ????*

बाळासाहेब पिसाळ

*????दिवाळी हा दिव्यांचा सण!????*

*????जि.प.कें.प्रा.शा. चितेगाव शाळेत दीपोत्सव उत्साहात साजरा ????*

_विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करणाऱ्या ज्ञानमंदिरात जि.प.कें.प्रा.शा. चितेगाव शाळेत आज दिवाळी सणानिमित्त शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने शालेय इमारत उजळून निघाली. या शाळेतील विद्यार्थ्याना प्रमिथ फाऊंडेशन च्या ग्रीन एज्युकेशन मूव्हमेंट इन स्कूल प्रकल्प अंतर्गत पणत्यां देण्यात आल्या होत्या. या पणत्यांना मुलांनी रंग देऊन खुप आकर्षक बनविले होते. याच पणत्यांचा दीपोत्सव मा.केंद्रीय मुख्याध्यापक पंडित भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव महाराष्ट्रातील जि.प.प्राथमिक शाळेतील अनोखा उपक्रम म्हणता येईल या उपक्रमासाठी विशेष सहकार्य प्रमिथ फाऊंडेशनच्या अर्चना शिर्के, ज्ञानेश्वर हावळे,बाळासाहेब पिसाळ, उद्धव गाबूड यांनी केले व दीपोत्सव साठी सहशिक्षक महेश लबडे तसेच शाळेचे शापोआ कर्मचारी व विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते.????????????

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे