प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
अहमदनगर : पारनेर पोलिस स्टेशन येथे भा . द . वी . कलम ३५४ (ड ) (१ ) (२ ) , ५०४ , ५०६ , व पॉक्सो ॲक्ट कलम ११ ( ४ ) , १२ या कलमा नुसार दाखल गुन्ह्यातील निघोज येथील आरोपी पिता पुत्राची अहमदनगर येथील मा विशेष सत्र न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे
मौजे निघोज ता पारनेर जि अहमदनगर येथील आरोपी युवक व त्याचे वडील यांचे विरुद्ध एका अल्पवयीन मुलीने पारनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती सदर तक्रारी मध्ये आरोपी युवक हा अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी इच्छा नसताना पाठलाग करून तिला प्रेमाबद्दल विचारणा करत असे तसेच फोन करून त्रास देत असे व बोलेरो जीप ने शाळेत येत जात असताना पाठलाग करत असल्याबाबत तसेच आरोपी युवकाचे वडिलांनी धमकी देऊन शिवीगाळ केल्या प्रकरणी तक्रार दिली होती त्या प्रमाणे सदर आरोपीचे विरुद्ध भा द वी कलम ३५४ ( ड ) (१ ) ( २ ) ५०४ , ५०६ व पोक्सो ॲक्ट कलम ११ ( ४ ) , १२ या कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी आरोपी पिता पुत्राच्या विरुद्ध अहमदनगर येथील मा विशेष सत्र न्यायालय मध्ये आरोप पत्र दाखल केले होते सदर प्रकरणाची मे कोर्टात सुनावणी झाली सरकार पक्षाने प्रस्तुत प्रकरणी सात साक्षीदार तपासले पैकी मुलगी अपलवयीन असल्याच्या मुद्द्यावर तीन तपासले मूळ फिर्यादी तिचा मामा व इतर सर्व साक्षीदार त्यांचे जबाबावर ठाम राहिले मूळ फिर्यादी ने प्रस्तुत प्रकरणी खाजगी वकिलांची नेमणूक केली होती आरोपीच्या वकिलांनी पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा खोटा असल्याचा युक्तिवाद केला आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा विशेष सत्र न्यायालयाने दि २१/०४/२०२२ रोजी आरोपी पिता पुत्राची निर्दोष मुक्तता केली आरोपीच्या वतीने ॲड प्रशांत मोरे व ॲड डी वाय जंगले यांनी कामकाज पाहिले व त्यांना ॲड देवा थोरवे ॲड प्रविण पालवे ॲड स्नेहल सरोदे ॲड अंशाबापु पुंड ॲड हनुमान सपकाळ ॲड सविता शिंदे यांनी सहकार्य केले